बातम्या / लेख

राज्यातील विद्यापीठांना राष्ट्रीय, जागतिक स्तरावर अग्रस्थानी आणावे – मंत्री चंद्रकांत पाटील

दिनांक : 25 February 2026

मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मानांकन उंचावणे आणि राज्यस्तरीय एसआयआरएफ पोर्टल विकसित करण्यासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. राज्यातील विद्यापीठांनी एनआयआरएफ तसेच जागतिक रँकिंगमध्ये उंच भरारी घेण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली. विद्यापीठांनी संशोधनाची गुणवत्ता वाढवणे, विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढवणे, दर्जेदार शिक्षण देणे, आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवणारी संशोधन प्रकाशित करणे, तसेच नॅक (एनएएसी) मानांकन सुधारण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.